सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (08:16 IST)

जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेण्याकरिता कोल्हापूर महापालिका प्रस्ताव देणार

जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेण्याकरिता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महापालिकेकडून प्रस्ताव देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनीपत्रकार परिषदेत दिली.
 
राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, “कोल्हापूर चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा जयप्रभा स्टुडिओ भारतरत्न लता मंगेशकर यांनी खरेदी केला होता. त्यातील निम्मी जागा काही वर्षांपूर्वी विकली होती. उर्वरित जागा महालक्ष्मी स्टुडिओज या भागीदारी फर्मने कायदेशीर रित्या खरेदी केली आहे. हा व्यवहार कायदेशीर असला तरी स्टुडिओ बाबत कोल्हापूरकरांच्या भावना जोडल्या आहेत. यामुळे खरेदीदार कंपनीस नियमाप्रमाणे शासनाने पर्यायी जागा द्यावी आणि स्टुडिओचा विकास करावा, अशी मागणी आपण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली होती.