बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आरोपी म्हणजे राक्षसाचा पुनर्जन्म: कोपर्डी २९ नोव्हेंबर रोजी अंतिम निर्णय

पूर्ण राज्य आणि देशाला हादरवणारे कोपर्डी प्रकरणी आज अखेरचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या प्रकरणी आता २९ नोव्हेंबर रोजी अंतिम निकाल कोर्ट देणार आहे. यामध्ये आज या तीन मुख्य आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आज पूर्ण झाला आहे. यामध्ये सरकारी वकील म्हणाले की या प्रकरणातील आरोपी हे राक्षसाचा पुनर्जन्म आहेत. ते तसे वागले आहेत. या तिघांनी आणि त्यांनी केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप त्यांना बिलकुल नाही. यामध्ये जर त्यांना जन्मठेप दिली गेली तरी त्यांच्यात सुधारणा होण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी' उज्ज्वल निकम यांनी कोर्टात आपले मत प्रगट केले आहे. 
 
आज सकाळी सकाळी साडे अकराच्या सुमारास निकम यांनी आरोपींच्या युक्तीवाद सुरू केला होता. जवळपास त्यांनी दीड तास हा युक्तीवाद केला आहे. तिन्ही आरोपी एकाच माळेचे मणी असून ते दोषी आहेत त्यांचा दोष लपवता अथवा माफीच्या लायक तर नाहीच उलट त्यांना फाशीच दिली पाहिजे असे असल्याचा दावा उज्ज्वल निकम यांनी केला आहे.
 
आरोपी संतोष भवाळच्या वकीलांनी कोर्टात त्यांचा अशील निर्दोष असून त्याच्याविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचा दावा केला. संतोष भवाळानं गुन्हा केलेला नाही.जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुने या दोन दोषींच्या शिक्षेबाबतचा युक्तीवाद मंगळवारी संपला आहे..आरोपींवर सिद्ध झालेल्या गुन्ह्यांमध्ये दोषींना जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. आता या प्रकरणाचा निकाल २९ नोव्हेंबर रोजी लागणार आहे.