रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (17:40 IST)

नागपूरमध्ये व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा, अनेकांचे जीव धोक्यात

नागपूर शहरात व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा निर्माण झालां आहे. कोरोना रुग्णांसाठी नागपुरात अवघे 291 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटर्ससाठी अनेक रुग्ण वेटिंग लिस्टवर आहेत. तर वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेकांना आपला जीवही गमावला लागला आहे.

नागपूर जिल्ह्यात सध्या 11 हजारच्या वर कोरोना रुग्ण आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  रोज 2000 च्या आसपास रुग्ण वाढत आहेत. पण संपूर्ण जिल्ह्यात कोव्हिड रुग्णांसाठी अवघे 291 व्हेंटिलेटर्स आहेत. सरकारी आणि खाजगी रुग्णालयात अवघे 291 व्हेंटिलेटर्स आहेत. अनेकांना वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. पण परिस्थिती सुधारण्याकडे प्रशासनाचं लक्ष दिसत नाही .