शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 सप्टेंबर 2021 (12:10 IST)

लावणी सम्राज्ञी सुरेखा ताई पुणेकर यांचे राष्ट्रवादीत प्रवेश

लावणी सम्राज्ञी सुरेखा ताई पुणेकर यांनी विधान परिषदेवर आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यांनी सुप्रिया ताई सुळे आणि शरद पवार यांची भेट घेण्याची माहिती देखील मिळाली आहे.जनतेची सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या सुरेखा ताईंनी आता राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे.येत्या 16 सप्टेंबर रोजी त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हातात घडल्याळ घालून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.  
 
येत्या 16 सप्टेंबरला मुंबईत एनसीपी ऑफिसात हा सोहळा रंगणार आहे.सुरेखा ताईंसह 16 कलावंत देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.सुरेखा ताई यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला.त्यांनी कधी शाळेची पायरी चढली नाही.आपल्या लावणीने महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.तर परदेशात देखील लावणीची नवी ओळख निर्माण केली आहे.आपल्या कलेने त्यांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.