शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 सप्टेंबर 2021 (08:37 IST)

उत्तर प्रदेशात सर्व 403 जागा लढवणार शिवसेना, युतीदेखील करण्याच्या तयारी

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेनं उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

2022 च्या विधानसभा निवडणुकीत सर्व 403 जागा लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. या निवडणुकीसाठी भविष्यात युती करण्याचे संकेतही देण्यात आलेले आहेत.शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या लखनऊमध्ये झालेल्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती, पक्षाचे प्रदेश प्रमुख ठाकूर अनिल सिंह यांनी दिली.
 
उत्तर प्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेलेली आहे. कोरोनाकाळात मृतदेहांचीदेखील विल्हेवाट लावता आली नाही.राज्यात सगळीकडं जंगराज आहे,अशी टीकाही त्यांनी योगी सरकारवर केली.