सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 सप्टेंबर 2021 (08:41 IST)

साकीनाका प्रकरणी 1 महिन्यात आरोपपत्र दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

साकीनाका याठिकाणी घडलेल्या महिलेच्या बलात्कार प्रकरणी एका महिन्यात आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. तसंच जलदगती न्याय कसा दिला जातो, हेही अशा नराधमांना दाखवून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
 
या प्रकरणी तातडीनं सरकारी वकिलांची नियुक्ती करून न्यायालयीन खटल्याची तयारी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेत,त्यांना या सूचना केल्या.
 
हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.तसंच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठीदेखील प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
 
मुंबई या शहराची ओळख सुरक्षित शहर अशी आहे. पण अशा घटनांमुळं ती ओळख डागाळू नये, याची काळजी घेण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी काही सूचना केल्या आहेत.