शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (16:34 IST)

बाळाला सोडून माता पसार, रुग्णालायचा बेपर्वाई कारभार

Leaving the baby and passing the mother
औरंगाबाद : प्रसुतीच्या चोवीस तासानंतर मातेने तिच्या बाळाला सोडून घाटी येथून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे.या घडलेल्या घटनेप्रकरणी बेगमपुरा पोलिस स्टेशनला त्या मातेविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
29 ऑगस्ट रोजी सदर मातेने घाटीच्या रुग्णालयात बाळाला जन्म दिला होता.30 ऑगस्ट रोजी तिने दवाखान्यातून अचानक पलायन करत बाळाला बेवारस सोडून दिले.रुग्ण महिलेने दवाखान्यातून पलायन केल्याने रुग्णालय प्रशासन खळबळून जागे झाले होते.मात्र इतक्या उशिरा ही बाब उघड झाली त्यामुळे रुग्णालय प्रशासन झोपले होते का असा प्रश्न उभा राहील आहे.
 
या प्रकरणी बेगमपुरा पोलिस स्टेशनला त्या मातेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.घाटीचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण सुखदेवे यांच्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या मातेचा शोध सुरु आहे.