शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (08:00 IST)

विधिमंडळ अधिवेशन दिवस पहिला :2 दिवसांचं पावसाळी अधिवेशन आजपासून

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन फक्त दोनच दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
 
5 आणि 6 जुलै म्हणजेचं आज आणि उद्या मुंबईत हे अधिवेशन होईल.
 
यंदाच्या अधिवेशनात मराठा आरक्षण, OBC राजकीय आरक्षण, बदली प्रकरणातील भ्रष्टाचार यांच्यासह सचिन वाझे प्रकरण आदी मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.
 
मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मनसुख हिरेन-सचिन वाझे प्रकरण समोर आलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले होते.
 
त्यानंतर पुढील काही दिवसांत याप्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सद्यस्थितीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीपर्यंत हे प्रकरण येऊन ठेपलं असून रोज नवनवे अपडेट्स समोर येत आहेत.
 
या सर्व ज्वलंत विषयांव्यतिरिक्त आणखी एका विषयाची या यादीत भर पडली.
 
MPSC पास झालेल्या पुण्यातील स्वप्निल लोणकर या परीक्षार्थीने दोन वर्षांपासून मुलाखतच होत नसल्यामुळे कंटाळून आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर MPSC च्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रात याबाबत वातावरण तापलं आहे.
 
या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष आहे.