बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (15:37 IST)

बिबट्याचा बछडा शिकार करतांना झाला ‘शिकार’

सावजाचा पाठलाग करताना एका बिबट्याचा बछड्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. ही घटना निफाड तालुक्यातील कोकणगाव परिसरात घडली आहे.
दरम्यान रात्रीच्या वेळी बिबट्या सावजाच्या शोधात फिरत असतात. अशावेळी कोरड्या किंवा पाण्याने भरलेल्या विहिरी रात्रीच्या सुमारास दिसत नाही, त्यामुळे अशा घटना घडतात. निफाड वन परिक्षेत्रांतर्गत कोकणगाव येथील रहिवासी असलेलय ग्रामस्थाच्या शेतातील विहिरीत बिबट्यासारखा प्राणी पाण्यावर तरंगताना दिसला.
त्यानंतर त्यांनी ही बाब वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना सांगितली. त्यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याच्या बछड्यास बाहेर काढले. मांजरीचा पाठलाग करताना बिबट्याचा बछडा विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
निफाड तालुक्यात वेळोवेळी बिबट्याच्या हल्ल्याच्या विहिरीत पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. येथील परिसर हा बिबट्याला राहण्यासाठी अनुकूल वातावरण, मुबलक पाणी असल्याने येथे बिबट्याचे वास्तव्य दिसून येते. दिवसभर शांत असणारे बिबटे रात्री अन्न-पाण्याच्या शोधात बाहेर पडतात. रात्री अंदाज न आल्याने बिबट्याचा बछडा विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. निफाड येथील वनविभागाच्या उद्यानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.