मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (13:25 IST)

राज्यात निर्बंधांचा निर्णय आज किंवा उद्या घेतला जाऊ शकतो

26 डिसेंबर 2021 म्हणजेच रविवारी मुंबईत 922 नवीन कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आली. तर 28 डिसेंबरला 1377 कोरोनारुग्ण सापडले आहेत.
 
याबाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यामध्ये टोपे म्हणाले, "अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आज (29 डिसेंबर) 2000 च्या पुढे येण्याची शक्यता आहे. मुंबईचा पॅाझिटिव्हीटी रेट 4 टक्के येऊ शकतो. हे अजिबात चांगलं नाही. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. काळजी घेतली नाही तर किंमत चुकवावी लागेल. निर्बंध वाढवण्याची गरज निर्माण होऊ शकेल. मुख्यमंत्री आणि आरोग्यविभाग याबाबत निर्णय घेतील. परिस्थिती पहाता निर्बंधाबाबत आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे."
 
लसीकरणाबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले, "साडेपाच कोटी लोकांना दुसरा डोस मिळालाय. लहान मुलांसाठी कोव्हॅक्सीन मिळणार असून शालेत जाऊन लस देता येईल का याबाबत विचार सुरू आहे. बूस्टर कोणता द्यायचा याबाबत अद्याप निर्णय केंद्राने ठरवलेला नाही. त्याच लशीचा बूस्टर द्य़ायचा की दुसऱ्या लशीचा याबाबत निर्णयाची वाट पहात आहोत. लाट असली तरी महाराष्ट्र सज्ज आहे. आपली तयारी आहे. घाबरून जाण्याचं कारण नाही."
 
महाराष्ट्रात कोरोनासंसर्गाची तिसरी लाट जानेवारी महिन्यात येऊ शकते अशी भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली होती. येणारी संभाव्य तिसरी लाट ओमिक्रॉन व्हेरियंटची असेल असं तज्ज्ञ म्हणतात.