शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (15:52 IST)

मुख्यमंत्री आता गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार -आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती. तर मुख्यमंत्री आता गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत वेगाने सुधारत असून लवकरच मुख्यमंत्री कामाला सुरुवात करतील असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्यातील १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. उद्याच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री या प्रस्तावावर निर्णय घेतील अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना परिस्थिती आणि शाळा सुरु करण्याच्या विषयावर माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत टोपेंना प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर राजेश टोपे म्हणाले की, मला माहिती मिळाल्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक आहे. मुख्यमंत्र्यांचे सध्या रुग्णालयातच फिजियोथेरेपीचे सेशन्स सुरु आहेत. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिजियोथेरेपी देण्यात येत आहे. फिजियोथेरेपीचे सेशन्स पुर्ण झाल्याशिवाय कामाला सुरुवात करु नये असा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची तब्येत वेगाने बरी होत असून लवकरच ते कामाला सुरुवात करतील अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.