बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (15:49 IST)

शिंदेंनी ही निवडणूक अधिक गांभीर्यानं घ्यायला हवी होती : शरद पवार

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. जावळी सोसायटी गटातून शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली आहे. शशिकांत शिंदे यांना 24 तर रांजणे यांना 25 मतं मिळाली. 
शशिकांत शिंदे यांच्या पराभवाबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. पण मला असं वाटतं की शिंदेंनी ही निवडणूक अधिक गांभीर्यानं घ्यायला हवी होती, असं शरद पवार म्हणाले. दरम्यान, शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर केलेल्या दगडफेकीनंतर शरद पवार यांनी काल संध्याकाळी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शशिकांत शिंदेही उपस्थित होते. या बैठकीत शिंदे यांच्या पराभवाबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली होती