1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (11:01 IST)

राज्यात गारपिटी आणि पावसामुळे शेतकरी संकटात

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यतील अनेक गावांना मुसळधार पावसाने आणि गारपिटीने तडाखा बसला आहे. वैजापूरच्या देवगाव ,शनि चेंडूफळ, बाजाठाण , गाढेपिंपळगाव, मांजरी फाटा, आणि गंगापुर मध्ये गारपीट आणि पाऊस झाला. तर कन्नड आणि पैठणमध्ये ही तुफान पाऊस झाला.
 
विदर्भातही अवकाळी पावसानं थैमान घातलंय. अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्याला सकाळीच पाऊस आणि गारपीटीनं झोडपून काढलं. वणी बेलखेडा आणि घाटलाडकी परिसरात तुफान गारपीट झाली. या गारपिटीने संत्र्याचा आंबिया बहार हातातून जाण्याची शक्यता आहे.
तूर, हरभरा, कांदापिकालाही गारपीटीचा फटका बसण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात गारपीट झाली. नरखेड तालुक्यातील वाढोना आणि मेंढला परिसरात गारपीट झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. उशिरा लागवड केलेल्या फुलोरा अवसतेत असलेल्या तूर आणि हरभरा पिकांसाठी हा पाऊस नुकसानदायी आहे. आणखी दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्यात गारपीट झालेली आहे. नरखेड तालुक्यातील वाढोना आणि मेंढला परिसरात गारपीट झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. अवकाळी पावसानं संत्रा फळबागेचं नुकसान झालं आहे.