मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (10:08 IST)

चिमुरडीला मारून उकिरड्यावर फेकले

baby girli was killed and thrown on the coals चिमुरडीला मारून उकिरड्यावर फेकले  Marathi Regional News  In Webdunia Marathi
आजच्या युगात जिथे मुली मुलांच्या बरोबरीने पुढे वाढत आहे. तर काही भागात मुलीचे जन्म होणे दुःखद मानले जातात. आजच्या आधुनिक काळात मुली यशाची भरारी घेत असता काळीज पिळवटून टाकणारी घटना अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुकातल्या भोईपुरी गावात घडली आहे .येथे 28 डिसेंबर रोजी  एका उकिरड्यावर कचऱ्याच्या ढिगारात एका दिवसाचे स्त्री अर्भक आढळले. या अर्भकाला मारून इथे फेकले होते. 'नकोशी' असलेल्या या मुलीला कोणी फेकले हे अज्ञात आहे. या घटनेमुळे  परिसरात खळबळ उडाली आहे. मोर्शी वरुड मार्गावर एका उकिरड्यात ही चिमुरडी आढळली . मोर्शी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृत अर्भकाला ताब्यात घेऊन मृतदेह रुग्णालयात आणले. पोलीस या चिमुरडीच्या मातेचा शोध घेत त्या मातेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.