1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (12:12 IST)

चला किल्ले रायगड पाहुया, रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश

see Fort Raigad
शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रायगडावर 24 तास प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासात पुरातत्व विभागानं मान्यता दिली. एरवी किल्ल्यावर सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किल्ल्यावर पर्यटकांना परवानगी असते.
 
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि त्यातून निर्माण होणारा कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. शिवजयंती दिनी मुंबईत कलम 144 लागू केलं आहे.