1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (09:59 IST)

IDOL चे प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर, आजपासून अर्ज भरता येतील

Mumbai University Idol Admission Schedule Declared
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे जानेवारी सत्राच्या प्रवेशाचे वेळापत्रक जारी झाले असून 19 जानेवारी पासून इच्छुक विद्यार्थांना अर्ज भरता येतील. या प्रवेश प्रक्रियेत बारावी फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तसेच प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. विद्यार्थ्यांना 30 जानेवारीपर्यंत IDOL च्या वेबसाइटवरून अर्ज भरता येईल.
 
या सत्राच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रथम आणि द्वितीय सत्र FYBA, FYBCOM, MA चे सेमिस्टर एक आणि दोनच्या इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. तसेच MCOM सेमिस्टर एक आणि दोन या वर्षांचीही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे SYBA, SYBCOM सोबतच MA व MCOM चे पार्ट दोनची ही प्रवेश प्रक्रिया या कालावधीत होईल. 
 
दूर व मुक्त शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे 2017 मध्ये जाहीर नवीन नियमावली प्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या IDOL संस्थेला जुलै आणि जानेवारी या दोन सत्रांच्या प्रवेशाला मान्यता देण्यात आली आहे.