अभ्यासाला लागा, तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

exam
Last Modified मंगळवार, 19 जानेवारी 2021 (16:18 IST)
राज्यात सामायिक प्रवेश कक्षाने तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
केले आहे. त्यामुळे सुधारित वेळापत्रकानुसार २१ जानेवारीपासून कॉलेज सुरू होणार आहेत. तर इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, एमसीए आणि एमटेक आदी अभ्यासक्रमांसाठी हे वेळापत्रक असणार आहे.

मराठा आरक्षणाला स्थगित केल्याने विद्यार्थ्यांना खुला गट किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून प्रवेश करण्याचे आदेश होते. मात्र विद्यार्थांना डॉक्युमेंटस जमा करताना अडचणी येत असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवण्यात आली. व आता पुन्हा सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत जाहीर झालेल्या जागेवरील प्रवेश निश्चित करण्यासाठी २० जानेवारी २०२१ दुपारी तीनपर्यंत लॉग इनमधून मान्य करु शकतील किंवा स्वीकारु शकतील. २० जानेवारी रोजीच सायंकाळी पाच वाजेपर्यंतच विद्यार्थ्यांनी कागदपत्रे व शुल्क भरुन प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर २१ जानेवारी रोजी दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील जाहीर होईल. २१ ते २३ जानेवारीदरम्यान विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवता येईल. तर २५ जानेवारी दुसऱ्या फेरीचे प्रवेश जाहीर होतील. २६ ते ३० जानेवारी (दुपारी तीनपर्यंत) विद्यार्थ्यांना आपला लॉग इनमधून प्रवेश मान्य करु शकतात. तर २७ ते ३० जानेवारी (सायंकाळी पाचपर्यंत) विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेत शुल्क भरुन व कागदपत्रे सादर करुन प्रवेश निश्चित करु शकतात. २१ जानेवारीपासून सर्व कॉलेज सुरु होतील. या प्रवेशप्रक्रियेसाठी पाच फेब्रुवारी ही अंतिम तारीख असणार आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

शरद पवार नरेंद्र मोदीं विरोधात आघाडी उभी करू शकतील का?

शरद पवार नरेंद्र मोदीं विरोधात आघाडी उभी करू शकतील का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या (22 जून) दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक ...

RSS: डॉ. केशव बळीराम हेडगेवार कोण होते?

RSS: डॉ. केशव बळीराम हेडगेवार कोण होते?
'हिंदू संस्कृती हिंदुस्तानाचा श्वास आहे. त्यामुळे जर हिंदुस्तानाचं संरक्षण करायचं असेल, ...

अविनाश भोसलेंवर ईडीची कारवाई, अविनाश भोसले कोण आहेत आणि ते ...

अविनाश भोसलेंवर ईडीची कारवाई, अविनाश भोसले कोण आहेत आणि ते वादात का असतात?
श्रीकांत बंगाळे अंमलबजावणी संचालनालयाने अविनाश भोसले यांची 40 कोटींपेक्षा जास्तीची ...

60 रुपयात एक लीटर इंधन मिळणार-नितीन गडकरी

60 रुपयात एक लीटर इंधन मिळणार-नितीन गडकरी
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.सामान्य जनतेला या मधून दिलासा ...

शरद पवारांच्या बैठकीसाठी 'या' 7 महत्त्वाच्या नेत्यांना ...

शरद पवारांच्या बैठकीसाठी 'या' 7 महत्त्वाच्या नेत्यांना निमंत्रण, कोण कोण उपस्थित राहणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या (22 जून) दिल्लीत विरोधी पक्षांची ...