शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (08:57 IST)

राज्यातील तापमानात मोठी वाढ, अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती कायम

उत्तरेकडून येणारे वाऱ्यांपेक्षा सध्या दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने पुण्यासह राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुढे अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. राज्यात सोमवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.
 
याबाबत ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, मध्य भारत आणि पश्चिम बंगालच्या परिसरात जास्ता दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे अजूनही दक्षिणेकडून वारे येत आहे. या वाऱ्याबरोबर पश्चिम बंगालच्या उपसागरावरुन येणारे बाष्पयुक्त वारेही असल्याने आपल्याकडे काही 
 
ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येत आहे. याचा परिणाम जानेवारीमध्येही सकाळी जाणवणारी थंडीही कमी झाली आहे. रात्री फॅन लावावा लागत आहे. अजून किमान दोन दिवस ही परिस्थती राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तरेकडील वार्यांचा जोर वाढल्यास आपल्याकडे थंडी परतण्याची शक्यता आहे.