गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (08:55 IST)

राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात

मुंबईसह राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. 'कोविन' अॅपमधील बिघाडामुळे लसीकरण थांबलं होतं. पण आता पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईतील 9, राज्यातील 285 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. राज्यात आठवड्यातील 4 दिवस लसीकरण सुरू राहणार आहे. 
 
आठवड्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधला.
 
कोविन ॲपवर ज्यांची नोंदणी होईल त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. या दरम्यान एखाद्याला लस घेतल्यानंतर ताप, स्नायूदुखी यासारखे प्रतिकूल परिणाम जाणवल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि उपचार करा. गंभीर लक्षणे आढळल्यास त्यांची जास्त काळजी घ्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

लसीकरणात दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी रोग प्रतिकारक क्षमता तयार होते. त्यामुळे लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधासाठी जे नियम आहेत त्याचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.