गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पाटणा , मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (11:12 IST)

बिहार निवडणूक : पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार सोमवारी संपला. पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी 28 ऑक्टोबरला म्हणजे बुधवारी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यसमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांचा विश्वासार्हतेसह अनेक राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 
 
यापैकी 4 भाजप आणि जेडीयू कोट्यातील 4 मंत्री आहेत. विरोधकांनी विविध मुद्द्यांवर सरकारला घेरले आहे. तसेच अनेक जागांवर बंडखोर हे सत्ताधारंसाठी आव्हान बनले आहे.