बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (09:26 IST)

नागपुरमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसची दुस-या टप्प्यातील मानवी चाचणी सुरु

नागपुरात कोव्हॅक्सिनच्या दुस-या टप्प्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झालीय. गिल्लूरकक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दुस-या टप्प्यात 50 जणांना लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत कोणालाही दुष्परिणाम दिसून आला नसल्याचं डॉ चंद्रशेखऱ गिल्लूरकर यांनी सांगितल.
 
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या लसीचच्या दुस-या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात झालीय.  दुसऱ्या टप्प्यात देशातील 8 केंद्रांची निवड कऱण्यात आली .नागपुरातील गिल्लूकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची निवड करण्यात आलीय.
 
याबाबत माहिती देताना डॉ चंद्रेशेखर गिल्लूरकर म्हणाले की पहिल्या टप्प्यात 750 व्यक्तिंना लस देण्यात आली. दुस-या सॉटप्प्यात 380 जणांना लस देण्यात येयेत..त्याकरता नागपुरातील गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये 75 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
 
यातील 25 जण कोरोनाबाधित वा कोरोना होवून गेल्याचं आढळून आल्यानं 50 जणांची मानवी चाचणीकरता निवड करण्यात आली.पहिल्या टप्प्यात 55 जणांना लस देण्यात आली होती. आता दुस-या टप्प्यात 12 ते 65 वयोगटातील 50 जणांना लस देण्यात आली.यामध्ये 12 ते 18 वयोगटातील 8 जणांचा समावेश आहे.
 
तर 55 ते 65 वयोगटातीलही 8 जण आहेत तर 22 महिलांचाही समावेश आहे..दुस-या टप्प्यातील दुसरी लस 28 दिवसांनी देण्यात येणार आहे.भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन जानेवारीपर्यंत उपलब्ध होण्याचा विश्वासही डॉ चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी व्यक्त केलाय.