शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (22:04 IST)

काय म्हणता तंबाखूपासून कोरोना व्हायरसवरची लस

तंबाखू बनवणारी जगातली दुसरी सगळ्यात मोठी कंपनी असलेल्या ब्रिटिश अमेरिकन टोबॅको या कंपनीने तंबाखूच्या झाडापासून कोरोनाची लस तयार केल्याचा दावा केला आहे. ही लस बनवण्यासाठी वापरलेले घटक तंबाखूच्या झाडापासून घेतल्याचं कंपनीने सांगितलं आहे. लस बनवण्यासाठी कोरोना व्हायरसचा एक भाग कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आला, यानंतर व्हायरसची संख्या वाढवण्यासाठी याला तंबाखूच्या पानांवर सोडण्यात आलं. पण जेव्हा तंबाखूची पानं कापण्यात आली तेव्हा यामध्ये व्हायरस मिळाला नसल्याचा कंपनीचा दावा आहे.
 
तंबाखूच्या पानांपासून लस बनवणं सगळ्यात जलद आणि सुरक्षित असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. एवढच नाही तर या लशीला थंड तापमानात ठेवण्याचीही गरज नसल्याचं कंपनीने सांगितंल आहे. या लसीचा एकच डोस इम्यून सिस्टिमसाठी परिणामकारक  असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या लशीची प्री क्लिनिकल ट्रायल एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. या ट्रायलचा निकाल यशस्वी होता, आता माणसांवर याची ट्रायल करण्याची तयारी सुरू आहे.