1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Vande Bharat Mission second phase from 16 May

वंदे भारत मोहीमेचा १६ मे पासून दुसरा टप्पा

Vande Bharat Mission second phase from 16 May
कोरोना व्हायरसमुळे परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी पुन्हा आणण्यासाठी मोदी सरकारने वंदे भारत मोहीम सुरु केली आहे. १६ मे ते २२ मे या काळात या मोहिमेचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात ३१ देशांत १४५ विमाने पाठवून भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जाईल. 
 
आता दुसऱ्या टप्प्यात  फ्रान्स, जर्मनी, इटली, आयर्लंड, थायलंड, रशिया, कझाकिस्तान, युक्रेन, किर्गीस्तान, जॉर्जिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नेपाळ या देशांमध्ये भारतीय विमाने पहिल्यांदाच जाणार आहेत.  अमेरिकेत सर्वाधिक १३, त्यापाठोपाठ संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) ११, कॅनडात १० , सौदी अरेबियात आणि ब्रिटनमध्ये प्रत्येकी ९ विमाने पाठवण्यात येणार आहेत.  
पुढील लेख
१७ तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक जिल्ह्यांनी व्यवस्थित सुचना कराव्यात - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे