मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 9 मे 2021 (10:36 IST)

मुंबईतील कोरोनाचं चित्र फसवं, बनवाबनवी थांबवा- फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईतील कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचे आभासी आकडे दाखवण्यासाठी लपवाछपवी केली जात आहे. ही दिशाभूल आणि बनवाबनवी थांबवा, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कोव्हिड स्थितीबाबत गंभीर आरोप केले आहेत. तसंच सेलिब्रिटी आणि पीआर कंपन्यांचा वापर केला जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.
मुंबईत 1 लाख क्षमता असतानाही केवळ 34 हजाराच्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत. त्यातही अँटिजेनचं प्रमाण 30 टक्के आहे. ज्याठिकाणी RTPCR चाचण्या करणं शक्य आहे तिथं अँटिजेनचं प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये, असंही या पत्रात फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीस यांनी दिवसानुसार आकडेवारी पत्रात मांडली आहे. संसर्ग कमी होत असल्याचे दाखवण्यासाठी चाचण्या नियंत्रित केल्या जात आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.