बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (08:09 IST)

भगवा बॉम्ब फुटू द्या, तुमचे आमचे विचार जुळू द्या’, शेलारांनी राऊतांना घातली युतीची साद

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना आता भाजप-शिवसेनेच्या युतीची चर्चा सूरू झाली आहे. ही चर्चा सूरू होण्या मागचे कारण म्हणजे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना युतीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकत्र येण्याची साद घातली आहे.
एका दिवाळी अंकाच्या कार्यक्रमात बोलताना शेलार यांनी युतीबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. येणाऱ्या काळात भागवा बॉम्ब फोडा, असं आवाहनहच शेलार यांनी राऊतांना केलंय. आता भगवा बॉम्ब फुटू द्या, तुमचे आमचे विचार जुळू द्या, असे वक्तव्य करत शेलार यांनी केले आहे. एकत्र मिळून चुका सुधारू, हा आमचा प्रस्ताव नाही तर हे मनोगत आहे, असं आवाहनच शेलार यांनी यावेळी राऊतांना केलंय.
आशिष शेलार पुढे म्हणाले, राऊत साहेब पत्रकारांना नोबेल मिळाला आहे. मात्र, राऊत साहेब ज्यांच्या हातात कायदा सुव्यवस्था आहे त्यांनी पत्रकारांना नोबेल सारखं वागवू नये. कभी-कभी मुझे ऐसे लगता है इस आदमी का क्या करें, असा मिश्किल टोलाही शेलारांनी लगावलाय.
कुठे रुबाब, कुठे कबाब
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही मलिकांवर जोरदार हल्ला चढवलाय. तुम्ही, राष्ट्रवादी एक आहात हे ठीक आहे. मात्र तिसरे मित्र जे आहेत ते योग्य दिसत नाहीत. त्याचबरोबर संजय राऊत तुमची सकाळची वेळ आता वेगळ्या व्यक्तींनी घेतली आहे. मात्र, इतरांसोबत तुलना होऊ शकत नाही. कारण सकाळ सकाळ कबाब बरोबर वाटत नाही. कुठे रुबाब आणि कुठे कबाब, अशा शब्दात शेलार यांनी नवाब मलिकांना जोरदार टोला हाणलाय.