शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (21:44 IST)

आठवले यांची कवितेतून महाविकास आघाडी सरकारवर टीका

केंद्रीय मंत्री रामदास आठवले संपाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात येऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलित महाविकास आघाडी सरकारवर  टीका केली. आठवले यांनी कवितेतून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. एसटीचं झालं नाही विलीनीकरण, तर ठाकरे सरकारचं होणार मरण, कर्मचारी येणार नाहीत शरण, कारण सरकारचं होणार आहे मरण, अशा शब्दात आठवले यांनी मविआ सरकारला इशारा दिला.
 
ठाकरे सरकारला जागं आणण्यासाठी लढा तीव्र करावा लागेल, असा इशारा देत रामदास आठवले यांनी शरद पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं म्हटलं आहे. एसटी नसती तर मी पुढारी नसतो असंही आठवले यांनी म्हटलं आहे. जय भीम आहे माझ्या गाठीशी, मी तुमच्या आहे पाठिशी, सरकारला सळो की पळो करुन सोडा असं आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केलं.