शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (21:50 IST)

राज ठाकरे यांची बाबासाहेब पुरंदरे यांना व्यंगचित्रातून अनोखी मानवंदना

राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना व्यंगचित्रातून अनोखी मानवंदना वाहिली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर यांच्यावर काही दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. 
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधी पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक आज साक्षात त्यांची सेवा करण्यासाठी निघाला, अशा शब्दांत राज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.