बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मार्च 2022 (07:51 IST)

गारवा! नाशिकमध्ये पावसाच्या हलक्या सरी!

उकड्यानंतर अचानक ढगाळ हवामान तयार होऊन  नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली.गेल्या काही दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली होती. त्यामुळे उन्हाचे दिवस सुरू झाल्याचे पाहायला मिळत होते. दरम्यान हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्याना येलो अलर्ट घोषित केला होता.
 
हवामान विभागाच्यानुसार पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान  निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता  वर्तविण्यात आली होती. त्यानुसार आज नाशिकमधील गंगापूर रोड, आंनदवल्ली, गिरणारे परिसर, नाशिक शहरातील काही भागात पावसाचा शिडकावा झाला. दरम्यान दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. यावेळी अनेकजण या पावसाचा आनंद घेताना दिसून आले.