शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (13:49 IST)

लोकल ट्रेन लवकरच सुरु होणार

महाराष्ट्रात लवकरच लोकल ट्रेन सुरु करणार असे संकेत राज्याचे केबिनेट मंत्री असलम शेख यांनी दिले.संपूर्ण पणे लसीकरण घेतलेल्या लोकांचा प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल अशी महत्वाची चर्चा राज्य मंडळाच्या बैठकीत झाली.टास्क फोर्स यांनी दिलेल्या अहवानंतरच काही निर्णय घेण्यात येईल.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता सध्या लॉक डाऊन लावण्यात आले होते.तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता काही निर्बंध लावण्यात आले होते.जेणे करून कोरोनाच्या प्रसार वाढू नये.आता हळू-हळू निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.
 
 कॅबिनेट मंत्री असलम शेख म्हणाले की,ज्या लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले असतील त्या लोकांना लोकलने प्रवास करता येईल.तसेच बेस्ट सेवा सुरु करण्या बाबत देखील काही निर्णय घेण्यात येतील आणि लवकरच त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.