गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (11:04 IST)

कारच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील चिस्तूर गावाजवळ झालेल्या कारच्या भीषण अपघातात कारचे नियंत्रण सुटल्याने अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग वरील नदीच्या दरीत कार कोसळून चालकासह प्रवासी ठार झाले.ही दुर्देवी घटना आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. 

या अपघातात तिघे जण ठार झाले तर या प्रवाशांपैकी एक जण बचावला आहे.याअपघातात कारचा चुराडा झाला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार हा अपघातात इतका भीषण होता की या अपघातात एका व्यक्तीचा मृतदेह झाडावर,एकाच वाहनात,तर एकाच तिथेच पडून होता. वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे अंदाज पोलिसांनी वर्तवले आहे.घटनास्थळी पोलिसांनी पोहोचल्यावर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठविले आहे.