गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जानेवारी 2020 (10:24 IST)

बाप्परे, प्रेमप्रकरणातून आधी हत्या आणि मग आत्महत्या

मुंबईतील भांडुप येथे प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीने डोक्यात रॉड घालून महिलेची हत्या या घटनेनंतर संशयीत आरोपीनेही आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. यस्मिता साळुंखे असं मृत महिलेचं नाव आहे. हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचं बोललं जात आहे. 
 
भांडुप पश्चिम येथील वक्रतुंड सोसायटीमध्ये ही मृत महिला राहत होती. सकाळीआपल्या मुलाला शाळेत घेऊन जात असताना अज्ञात व्यक्तीने मागून येऊन डोक्यात रॉड घालून तिची हत्या केली. यावेळी आरोपीने चेहऱ्यावर स्कार्फ लावला होता.
 
या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेत असताना कल्पतरु क्रेस्ट, भांडूप पश्चिम या इमारतीच्या बेसमेंटमध्ये संशयित आरोपी जखमी अवस्थेत आढळला. त्याला मुलुंड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. किशोर सावंत असं या आरोपीचं नाव आहे.