सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 जानेवारी 2020 (09:49 IST)

तर ठाकरे कधीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील

महाविकासआघाडीतील कुरबुरी अशाच सुरु राहिल्या तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, असा खळबळजनक दावा माजी खासदार आणि  यशवंतरावर गडाख यांनी केला. ते नेवासे येथे शंकरराव गडाख यांच्या सत्कार समारोहाप्रसंगी बोलत होते. 
 
त्यांनी म्हटले की, अनेक राजकीय तडजोडी करून तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, मंत्रिपद आणि बंगल्यांच्या वाटपावरून रोज कोणी ना कोणी रुसत आहे. उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला नसता तर काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी बाकांवर बसावे लागले असते. आताही तुम्ही सुधारला नाहीत तर उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, असे भाकीत यशवंतराव गडाख यांनी वर्तविले.