मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आता काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या टपावरही तीन रंगाचे दिवे

येत्या १ फेब्रुवारी २०२० पासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या टपावरही तीन रंगाचे दिवे लावण्यात येणार आहेत. बुधवारी दिवे उत्पादकांची बैठक परिवहन आयुक्त कार्यालयात पार पडली. आता १५ जानेवारी २०२० ला टॅक्सी संघटनेशी चर्चा करुन या नियमांची अंमलबजावनी करण्यात येणार आहे.
 
taxi
मुंबई उपनगरात टॅक्सींची संख्या सरासरी ४५ हजार तर रिक्षाची सरासरी संख्या १ लाख ५० हजार इतकी आहे. पुर्वी मुंबईच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या बोनेटवर साधे मीटर होते. मीटर अप असल्यावर टॅक्सी प्रवाशांसाठी उपलब्ध आहे, तर टॅक्सीचा मीटर डाऊन असल्यावर टॅक्सीत प्रवासी आहेत, असे संकेत पाळले जायचे. मात्र कालांतराने शहरातील सर्व टॅक्सींमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्यात आले. हे मीटर टॅक्सीच्या आतमध्ये बसवल्याने बाहेरील प्रवाशाला टॅक्सीची उपलब्धता कळत नाही. याचाच गैरफायदा घेत काही टॅक्सी चालक सर्रासपण भाडे नाकारत होते.
 
त्यामुळे प्रवाशांच्या आणि टॅक्सी-रिक्षा चालकांच्या समस्या लक्षात घेऊन टॅक्सी आणि रिक्षाच्या टपावर तीन रंगाचे दिवे लावण्याचा निर्णय परिवहण विभागाने घेतला आहे.