मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

संभाजीराजे आणि राऊत यांच्यात ट्विटरवर वाद

भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवाजी महाराजांच्या वशंजांना प्रश्न विचारणाऱ्या संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ‘उद्धवजी त्या संजय राऊतच्या जिभेला लगाम घाला’, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजेंनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. 
 
खासदार संभाजीराजे यांनी ट्विट केल्यानंतर त्याला संजय राऊत यांनी लगेचच उत्तर दिले आहे. “मा. छत्रपती संभाजी राजे आम्ही आपला नेहमीच आदर करतो. संजय राऊत यांनी असे कोणते विधान केले? ज्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाल? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच चालत आहे. सदैव चालत राहिल. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र” असे संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.