गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 जानेवारी 2020 (16:42 IST)

गीझरमधील गॅस लीक झाला, वाढदिवसाच्या दिवशी झाला मृत्यू

मुंबईतील बोरीवलीतील गोराई येथे ध्रुवी गोहील (१५) आंघोळ करताना गीझरमधील गॅस लीकीज झाल्याने तिचा बाथरुममध्ये गुदमरुन मृत्यू झाला. विशेष म्हणजे ध्रुवीच्या वाढदिनीच तिचा मृत्यू झाला. ध्रुवी दहावीमध्ये शिकत होती. 
 
ध्रुवी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी आंघोळीला जाते असं सांगून बाथरुममध्ये गेली. पण एक तास झाल्यावरही ध्रुवी बाथरुममधून बाहरे न आल्यामुळे घरातल्यांनी बाथरुमचा दरवाजा बाहरुन वाजवला. यावेळी दरवाजा तोडून पाहिल्यावर ध्रुवी बाथरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. तसेच बाथरुममध्ये चार फूटापर्यंत काचेवर गॅस पसरलेला होता. ध्रुवीचा पायही गरम पाण्याने भाजला होता.
 
ध्रुवीला तातडीने मंगलमूर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण 24 तासांनतर ध्रुवीचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, मुलीचा मृत्यू गीझरमधील गॅस लीकीज झाल्यामुळे गुदमरुन झाला.