शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (17:52 IST)

अल्पवयीन बहिण-भावावर प्रेमी जोडप्याचा बलात्कार

ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये एक अत्यंत विकृत प्रकार समोर आला आहे. एका धक्कादायक प्रकारात एका तरुणीने 14 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला तर या तरुणीच्या प्रियकराने पीडित अल्पवयीन मुलाच्या 16 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
 
अल्पवयीन मुलावर अत्याचार करणारी तरुणी त्याचीच नातेवाईक आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याचा पुढील तपास सुरू केला आहे.
 
नेमकं काय घडलं? 
कल्याण पूर्व परिसरात हा प्रकार घडला असून एका अल्पवयीन भाऊ बहिणीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना ऐकून पोलीससुद्धा अवाक् झाले आहेत. पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर एक 23 वर्षीय तरुणी सातत्याने लैगिंक अत्याचार करत होती. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. ही तरुणी पीडित मुलाची नातेवाईकच आहे. आरोपी तरुणी इथेच थांबली नाही तर तिने तिच्या प्रियकराला पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीसोबत लैगिंक अत्याचार करण्यास भाग पाडले.
 
या दोघांची विकृती ही सातत्याने वाढत चालली होती तेव्हा अखेर दोन्ही अल्पवयीन पीडित भावा बहिणीने नातेवाईकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी प्रेयसी-प्रियकरांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
 
या संपूर्ण प्रकरणामुळे पीडित अल्पवयीन भाऊ-बहिणीवर तसंच पीडित आणि आरोपी अशा दोन्ही कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे.