सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (11:33 IST)

Lumpy Disease: हिंगोली जिल्ह्यात लम्पी व्हायरसचा उद्रेक पुन्हा सुरु

राज्यात जरी लम्पी व्हायरसचा उद्रेक कमी झाला असला तरीही राज्यातील काही जिल्ह्यात लम्पी व्हायरसच्या आजाराने डोकं वर काढले असून हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात ताड़कळस या ठिकाणी लम्पी व्हायरसच्या आजाराने डोकं वर केलं आहे. या भागात शेतकऱ्यांची जनावरे बाधित होत असून बाधित जनावरांची संख्या 20 झाली आहे. लम्पी व्हायरसने जनावरे बाधित झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.या भागात जनावरांचे लसीकरण देखील झाले आहे तरीही या आजाराच्या विळख्यात जनावरे येत असून त्यांचे वासरू देखील या लम्पी व्हायरसच्या विळख्यात जनावरे अडकत जात आहे.   

फुलकळस येथे देखील रंगनाथ सूर्यवंशी या शेतकऱ्याच्या गुरांचा  लम्पी व्हायरसने मृत्यू झाला आहे. सध्या ताड़कळस या भागात 20 जनावरांना  लम्पी व्हायरसची लागण झाली आहे. बाधित जनावरांना विलीगीकरण मध्ये ठेवावं,त्यांना स्वतंत्र पाणी आणि चारा द्यावं, ते इतर जनावरांच्या संपर्कात येऊ नये याची काळजी घेऊन या व्हायरसच्या प्रादुर्भावाला रोखता येऊ शकत. तसेच जनावरांचे लसीकरण करण्याचे आवाहन देखील तज्ज्ञ करत हे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता वेळीच जनावरांना पशु वैद्यकीय रुग्णालयात नेऊन उपचार करावे. 
 
Edited by - Priya Dixit