शुक्रवार, 27 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 25 जून 2022 (09:10 IST)

शिवसैनिकांकडून महाआरती आणि भक्ती प्रदर्शन

shivsena
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. आमदार सदा सरवणसर, दिलीप लांडे आणि मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली तसंच त्यांचे बॅनरही फाडले. दुसरीकडे उद्धव ठाकरेंवरचं हे संकट टळण्यासाठी महाआरती आणि भक्ती प्रदर्शनही केलं जात आहे. 
 
मातोश्री वरील विठ्ठलाच्या विरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्रचा प्रतिकार करण्याची शक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्राप्त व्हावी यासाठी पुण्यात येरवड्यातील राम मंदिरात महा आरती करण्यात आली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवण्यासाठी धुळे शहरात शिवसैनिकांनी भक्ती प्रदर्शन रॅली काढली. धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून तर महात्मा गांधी पुतळा पर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये शेकडो शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला.
 
'खून दिया है जान भी देंगे, उद्धव साहब तुम्हारे लिये'  असं पत्र एका शिवसैनिकाने आपल्या रक्ताने लिहिलं आहे. जळगावच्या भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहित आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही लढत रहा असा संदेश दिला आहे.