मंगळवार, 16 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 19 एप्रिल 2017 (11:01 IST)

प्लास्टिक अंड्यांच्या तपासणीत चुकीचे आढळले नाही

mahadev jankar
सध्या प्लास्टिक अंड्यांमुळे लोकांमध्ये संदिग्धता आहे, पण प्लास्टिकच्या अंड्यांबद्दल आतापर्यंत केलेल्या तपासणीत काहीही चुकीचे आ ढळले नसल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली. ना. जानकर यांनी अरबी समुद्रात बोटीने प्रवास करत मत्स्य विभागाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनीही माहिती दिली. कोलकातामध्ये प्लास्टिक अंडी आढळल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. त्यानंतर डोंबिवली आणि कल्याणमध्येही प्लास्टिक अंडी सापडल्याचे समोर आले होते पण, यानंतर केलेल्या तपासणीत काहीही चुकीचे आढळले नसल्याचे जानकार यांनी सांगितले.