कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदें यांची सपत्नीक पांडुरंगाची महापूजा संपन्न
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात आज विठ्ठल- रुक्मिणीची पूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नीसह केली. या वेळी पूजेसाठी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशिलाबाई वाळेगावकर यांना मान मिळाला.
तसेच या महापूजेत यंदा जिल्हा परिषदेतील शाळेतील 2 विद्यार्थ्यांना देखील प्रथमच पूजेचा मान देण्यात आला. उपमुख्यमंत्री हे आपल्या पत्नी लता शिंदे, मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे आणि नातू , सुनासह पूजेला उपस्थित होते. या वेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे, शेतकरी बांधवांना सुखी ठेव आणि महाराष्ट्राला नंबर एक राज्य होऊ दे असे साकडं विठ्ठलाकडे घातले.
तसेच मानाचे वारकरी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, जो पर्यंत हातपाय चालू आहे तो पर्यंत पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनाला यायचे अशी इच्छा आहे. भगवन्ताने सर्व काही दिलं, मात्र आता पाऊस थांबू दे. बळीराजावरील सर्व संकट दूर होऊ दे.
आम्हाला कधी विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळेल कधीच विचार केला नव्हता. विठ्ठलाची महापूजा आम्ही करू असं कधीही वाटलं न्हवत. असं म्हणत वाळेगावकर दाम्पत्याला अश्रू अनावर झाले.
Edited By - Priya Dixit