मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 (12:03 IST)

रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावर काम करत आहे- नितीन गडकरी

Maharashtra
Maharashtra Marathi Breaking News Live Today: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावर काम करत आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

11:08 AM, 4th Feb
पुण्यात गुलियन-बॅरे सिंड्रोमच्या 5 नवीन रुग्णांची नोंद
प्रदूषित पाण्यामुळे पुण्यात गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरच्या संसर्गाच्या संशयित प्रकरणांची संख्या आता 163 वर पोहोचली आहे. सविस्तर वाचा

10:46 AM, 4th Feb
सिग्नल बिघाडमुळे लोकल ट्रेन सेवा विस्कळीत, मुंबईला नवीन डिझाइनच्या गाड्या मिळतील- वैष्णव
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सिग्नल बिघाडामुळे मंगळवारी सकाळी लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली. ठाणे जिल्ह्यातील दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान दक्षिणेकडे जाणाऱ्या धीम्या ट्रॅकवर पहाटे 4.55 वाजता सिग्नल बिघाड झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे लोकल गाड्या 15-20  मिनिटे उशिराने धावल्या.   सविस्तर वाचा

10:24 AM, 4th Feb
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक संपन्न
मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची बैठक झाली. सविस्तर वाचा

09:44 AM, 4th Feb
सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले, गडचिरोलीमध्ये 4 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले
गडचिरोलीमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जिल्हा पोलीस दल आणि सीआरपीएफसमोर एका डीव्हीसीएम आणि एका एसीएम रँकच्या नक्षलवादीसह चार नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सविस्तर वाचा

09:19 AM, 4th Feb
नितेश राणे यांचे मोठे विधान, म्हणाले- महाराष्ट्रात धर्मांतराविरुद्ध सर्वात कठोर कायदा आणून दाखवू
महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे. चंद्रपूरमध्ये समस्त हिंदू समाजातर्फे एका भव्य धार्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राणे यांनी आपल्या भाषणात एका विशिष्ट समुदायाला इशारा दिला.

09:17 AM, 4th Feb
रेल्वे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रासह देशभरातील रेल्वेमध्ये केलेल्या गुंतवणुकीची माहिती दिली. देशभरातील रेल्वेमध्ये एकूण १ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

09:13 AM, 4th Feb
महाराष्ट्रात सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांना मराठी बोलावे लागेल अन्यथा कारवाई, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापासून सर्व सरकारी, निमसरकारी आणि महानगरपालिका कार्यालयांमध्ये मराठी भाषा बोलणे सक्तीचे केले आहे. सविस्तर वाचा

09:13 AM, 4th Feb
"आत्मपरीक्षण करा, महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही", देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना सल्ला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केली, यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सल्ला दिला आणि म्हणाले, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. सविस्तर वाचा