सोमवार, 10 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 9 फेब्रुवारी 2025 (18:10 IST)

श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे मुंबईत निधन

Maharashtra News update
Maharashtra Marathi Breaking News Live Today: श्रद्धा वालकर हीचे वडील विकास वालकर यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्यावर वसई येथील रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आपल्या मुलीच्या हत्ये नंतर श्रद्धाचे वडील विकास हे निराश झाले होते. मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलीच्या उर्वरित तुकड्यांची ते आतुरतेने वाट बघत होते.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
 

अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या पॉक्सो गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपीला अकोला स्थानिक शाखेने अटक केली.25 सप्टेंबर 2024 रोजी आरोपीविरुद्ध पुराना शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.सविस्तर वाचा.... 
 

आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीत तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा इरादा मतदारांनी फोल ठरवला आहे. दिल्लीतील दोन तृतीयांश जनतेचा जनादेश भाजपच्या बाजूने गेला. दिल्लीत 27 वर्षांनी भाजप पुन्हा सत्तेत आला आहे.सविस्तर वाचा.... 
 

नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. शाळेसमोरील शटरवर काम करण्यासाठी आलेल्या एका तरुणाने 17 विद्यार्थिनींचा विनयभंग केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पालकांमध्ये प्रचंड संताप आहे. शाळेच्या व्यवस्थापनाला घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर मुख्याध्यापकांनी तक्रार दाखल केली.सविस्तर वाचा.... 
 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. आता शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर विधान केले आहे.सविस्तर वाचा....

शनिवारी रात्री मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस कोचिंग डेपोच्या स्टोअर रूममध्ये आग लागली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली आणि बचाव कार्य सुरू केले.सविस्तर वाचा....

डोंबिवलीमध्ये ऑटो रिक्षा उलटून झालेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर 49 वर्षीय ऑटो रिक्षाचालक जखमी झाला.यश दिलीप वास्ते (19) असे मृताचे नाव आहे.यश हा एका हॉटेलमध्ये शेफ होता. डोंबीवली पश्चिम भागात आपल्या कुटुंबासह रहायचा.  चालकाची ओळख पटली असून किरण बिंगी त्याच इमारतीत वातव्यास आहे. सविस्तर वाचा....

नाशिक जिल्ह्यातून एक लज्जास्पद बातमी समोर आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका 13 वर्षाच्या  विद्यार्थिनीवर तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याच्या घरात बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात, एका शाळेतील शिक्षकावरही या घटनेत सहभागी असल्याचा आरोप आहे. शनिवारी, पोलिसांनी एका खाजगी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर वाचा.... 

पालघर जिल्ह्यात पोलिसांनी सुमारे अडीच कोटी रुपयांच्या क़ीमतीचे बंदी घातलेले अमली पदार्थ मेफेड्रोन जप्त केले आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे. हे अमली पदार्थ स्वता:च्या घरात हे औषध त्यार करत होता.  सविस्तर वाचा.... 

दिल्ली निवडणुकीच्या निकालांचा परिणाम यावर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांवर तसेच महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होईल.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर, विरोधी आघाडी महाविकास आघाडीतील पक्ष स्वतंत्रपणे नागरी निवडणुका लढवण्याची तयारी करत होते. पण दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी एमव्हीएला विचार करण्यास भाग पाडले आहे.  सविस्तर वाचा.... 

शिवसेना यूबीटीचे नेते संजय राऊत यांनी रविवारी सांगितले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आनंदी आहेत. गेल्या काही वर्षात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर हजारे यांच्या मौनावरही राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  सविस्तर वाचा.... 
 

श्रद्धा वालकर हीचे वडील विकास वालकर यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्यावर वसई येथील रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आपल्या मुलीच्या हत्ये नंतर श्रद्धाचे वडील विकास हे निराश झाले होते. मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलीच्या उर्वरित तुकड्यांची ते आतुरतेने वाट बघत होते  सविस्तर वाचा....