ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी बनावट कॉल सेंटर चालवण्याऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. बनावट कॉल सेंटर चालवणे आणि महिलांची फसवणूक करण्यासाठी मॅट्रिमोनियल साइटवर बनावट मॅट्रिमोनिअल प्रोफाइल तयार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 30 महिला याच्या बळी ठरल्या असून, त्यांच्याकडून अंदाजे 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.