Maharashtra Marathi Breaking News Live Today :मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीवरून एका व्यक्तीने उडी मारल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने मंत्रालयाच्या सुरक्षा जाळ्यात अडकून त्याचे प्राण वाचले. विजय साष्टे असे या व्यक्तीचे नाव आहे.विजय साष्टे हे पुण्यातील माळवाडी परिसरातील रहिवासी असून त्यांचे वय 41 वर्ष आहे. पास घेऊन ते मंत्रालयात दाखल झाले. महसूल विभागातील काम होत नसल्याने त्यांनी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी घेतली. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
01:47 PM, 26th Feb
बदलापूर अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणात पोलिसांना दिलासा, दंडाधिकाऱ्याच्या अहवालाला स्थगिती
12:50 PM, 26th Feb
मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारली
12:23 PM, 26th Feb
लाडकी बहीण योजना बंद होणार, काँग्रेसच्या खासदाराचा दावा
11:51 AM, 26th Feb
घरात घुसून वृद्धाची गळा चिरून हत्या, नागपूरची घटना
11:04 AM, 26th Feb
फ्रेंच कंपनीने एमएमआरडीएवर गंभीर आरोप केले,काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
10:37 AM, 26th Feb
फेब्रुवारीमध्ये उष्णता वाढणार, आयएमडीने मुंबईत यलो अलर्ट जारी केला
08:45 AM, 26th Feb
ठाण्यात सहकाऱ्याची हत्या करून फरार आरोपीला जम्मू-काश्मीरमधून अटक
08:44 AM, 26th Feb
ओएसडी आणि खाजगी सचिवांच्या नियुक्तीवरून कांग्रेसचा हल्लाबोल
08:43 AM, 26th Feb
जयंत पाटील चंद्रकांत बावनकुळेंना भेटले, राजकीय चर्चेला उधाण