मंगळवार, 5 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जून 2023 (09:43 IST)

शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार?

eknath shinde
Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रविवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. आता राज्य मंडळाच्या विस्तार होणार अशी चर्चा होऊ लागली आहे. दिल्लीच्या या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. 
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात यंदा एकनाथ शिंदे गटातील दोन खासदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच या मध्ये महिला आमदारांना देखील स्थान मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.राज्य मंत्री मंडळाचं विस्तार शिवसेना वर्धापन दिनाच्या आधी म्हणजे 19 जूनच्या आधी होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात वादग्रस्त मंत्र्यांना बाजूला केले जाणार असल्याची चर्चा आहे.   
 
Edited by - Priya Dixit