शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2017 (17:21 IST)

मुंबई शिवसेना अणि भाजपला जवळपास सारखीच मते

Maharashtra Civic Elections 2017
मुंबई महापालिकेत सर्वच्या सर्व २२७ जागांचे निकाल घोषित झाले असून शिवसेना अणि भाजपा या दोन्ही पक्षांना जवळपास सारखीच मते मिळाल्याचे दिसत आहेत. भाजपाला ८१, तर शिवसेनेला ८४ मते मिळाली आहेत. काँग्रेसला ३१, राष्ट्रवादीला ९, मनसेला ७, एमआयएमला ३, समाजवादी पक्षाला ६ आणि इतर 5 जागा मिळाल्या आहेत. नाशिक, पुणे, अकोला, नागपूर  या महापालिकांसह राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमळ फुलल्याचे दिसत आहे. तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही सेना वरचढ ठरली आहे.या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससह मनसे व इतर पक्षांची स्थिती बिकट केली हे आजच्या निकालाचे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय निरुपम यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला