मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 एप्रिल 2021 (21:40 IST)

Maharashtra Lockdown : 15 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर काय सुरू, काय बंद

कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर लॉकडाऊनची घोषणा केली. राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन असेल.
 
14 एप्रिल रात्री 8.00 वाजेपासून ते पुढील 15 दिवसांपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक वाहतूक बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
 
अचानक लॉकडाऊन लागू केल्यास, गोंधळ निर्माण होऊ शकतो हे जाणून सरकारने यासंदर्भात घोषणा करण्यापूर्वी पुरेसा वेळ घेतला. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सशी चर्चा केली. त्यानंतरच लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात आला.
 
राज्यात वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र तरीही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने प्रदीर्घ लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
 
राज्यात आजच्या घडीला कोरोनाचे पाच लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या आठवड्याभरापासून रोज 50 हजारांच्या पटीत रुग्ण वाढतायेत.
 
लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था, उद्योग ठप्प होते हे लक्षात घेऊन राज्य सरकारने लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध लागू केले. मात्र तरीही कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत नसल्याने वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला.
 
गेल्यावर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारनं अचानक लॉकडाऊन लावल्यानं स्थलांतरित मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे पायी चालत आपापल्या गावाकडे निघालेले दिसले. तसंच, कार्यालयं, व्यवसाय, कारखाने बंद झाल्यानं नोकऱ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. तो अजूनही कायम आहे.
 
संचारबंदी
14 तारखेपासून उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू होईल. पंढरपूर इथे निवडणुकीनंतर निर्बंध लागू होतील. सकाळी 7 ते रात्री 8 अति आवश्यक सेवा सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक बंद होणार नाही. ट्रेन, बस सुरू होणार. जीवनावश्यक सोयीसुविधा देणारा कर्मचारी वृंदांची येजा नीट व्हावी यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहील.
 
आस्थापने बंद राहतील
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सार्वजनिक आस्थापने बंद राहणार. हॉटेल आणि रेस्टॉरंटना पूर्वीचेच निर्बंध लागू असतील. पार्सल किचन सुरू राहतील.
 
काय सुरू असेल?
हॉस्पिटलं, डायग्नोस्टिक सेंटर्स, क्लिनिक्स, व्हॅक्सिनेशन, मेडिकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मसी, फार्मसिटकल कंपन्या, हेल्थ सर्व्हिस, उत्पादन यंत्रणा आणि त्याची वाहतूक करणाऱ्या यंत्रणा.
 
दवाखाने, विमा, औषधं, औषधी सेवा डिलर, लस उत्पादन कारखाने, लस वाहतूक वाहनं, वैद्यकीय कच्चा माल वाहतूक. जनावरांशी संबंधित- कृषीची जनावरं, पाळीव प्राणी, वेअरहाऊसिंग, पावसाळ्याची कामं करण्यासाठीचा कर्मचारी, रिझर्व्ह बँक, सेबी, ईकॉमर्स, अधिस्वीकृती धारक पत्रकार, पेट्रोल पंप, कार्गो सेवा, सुरक्षामंडळं सुरू राहतील.
 
किराणा, दूध, भाजीपाला दुकानं सुरू राहतील. कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस खुली असतील. विविध देशांचे दूतावास कार्यालयं सुरू राहतील.
 
पावसाळ्याची कामं सुरू राहतील. रिझर्व्ह बँक आणि सेबीप्रमाणित कार्यालयं सुरू असतील. टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित यंत्रणा तसंच मालवाहतूक, पाणीपुरवठा यंत्रणा सुरू राहतील.
 
कृषीक्षेत्राशी निगडीत खतं, बियाणं, उपकरणं, दुरुस्ती सुरू राहील. आयात-निर्यात यंत्रणा. ईकॉमर्स यंत्रणा. डेटा सेंटर्स, क्लाऊड सर्व्हिसेस, आयटी यंत्रणा सुरू राहतील. सरकारी आणि खाजगी सुरक्षायंत्रणा.
 
इलेक्ट्रिक आणि गॅस पुरवठा यंत्रणा. एटीएम, पोस्ट सेवा, बंदरं, परवानाधारक औषधं आणि फार्मा उत्पादनांची वाहतूक करणाऱी वाहनं
 
तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ
राज्य सरकारतर्फे अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्रत्येकी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत देणार आहोत. सात कोटी नागरिकांना ही सुविधा देण्यात येईल.
 
1500 रुपये अर्थसाहाय्य. 12 लाख बांधकाम वर्गाला याचा फायदा होईल. अधिकृत पाच लाख फेरीवाल्यांना 1500रुपये. 12 लाख परवानाधारक रिक्षाचालकांना 5000 रुपये देण्यात येईल.
 
शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार
शिवभोजन थाळी काही कोटी लोकांनी याचा लाभ घेतला आहे. दहावरून पाचवर किंमत करण्यात आली होती. आता ही थाळी मोफत देणार आहोत.
 
कशी होईल वाहतूक, काय असतील नियम?
रिक्षात-ड्रायव्हर आणि 2 प्रवासी
 
टॅक्सी-ड्रायव्हर आणि 50 टक्के क्षमतेने वाहतूक
 
बस-सीटिंग कपॅसिटीनुसार वाहतूक मात्र उभ्याने जा-ये करण्यास परवानगी नाही.
 
मास्क न घालणाऱ्या व्यक्तीला पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल.