शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 डिसेंबर 2021 (07:51 IST)

चित्रा वाघ यांच्या त्या टीकेला सत्यजित तांबेंचे जोरदार सणसणीत टोला

विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघाचे निकाल आज जाहीर झाले. दोन्ही मतदारसंघात भाजपने मुंसडी मारत विजय मिळवला. या निकालानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
त्यांच्या टीकेला युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उत्तर दिलं.विधान परिषदेच्या सहा जागांपैकी चार जागांवर बिनविरोध निवड झाली, तर नागपूर आणि अकोला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक झाली. दोन्ही
जागांवर भाजपने विजय मिळवल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाना लक्ष्य केलं.मंत्री… पालकमंत्री… मुख्यमंत्री… सर्व सरकारी यंत्रणा तिघाडीची असूनही जनतेनं भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल
यांच्या बाजूनं कौल दिला. विजयी उमेदवारांचं अभिनंदन! या निकालाचा अर्थ… शिवसेनेचा बाण भरकटलाय. घड्याळाचं टाईमिंग चुकलंय. जनतेनं काँग्रेसची साथ सोडलीय!”, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उत्तर दिला. चित्रा वाघ यांचं ट्वीट रिट्विट करत सत्यजित तांबे म्हणाले, “ताई, ही निवडणूक जनतेची नव्हती, तर नगरसेवक-जिप सदस्यांची होती. माहितीस्तव सादर,” असा टोला तांबे यांनी लगावला आहे.
या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही विजयी आमदारांचं अभिनंदन केलं. “मला आज अतिशय आनंद आहे की, माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड मोठा विजय मिळाला.