रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पोलिसांना मारहाण सूरूच

महाराष्ट्रात पोलिसांवर हल्ले सूरच आहेत. रोज नवीन घटना सुरु आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. नवीन घटनेत राज्यातील अहमदनगर येथील पाथर्डीत निवडणुकीच्या बंदोबस्तावरील पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत महादेव शिंदे हे फार जखमी झाले आहेत.  शिंदे यांनी बेशिस्त नागरिकांना  रांगेत उभं राहण्यास सांगितल होते त्यामुळे या कर्तव्य दक्ष पोलिसाला खाली पाडून जमावानं बेदम मारहाण केली आहे.  
 
यामधील अल्हनवाडी सोसायटीच्या मतदानावेळी रविवारी पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. त्यावेळी मतदान टेबलाजवळील गर्दीला रांगेत उभे राहण्यास सांगितल्यानं वाद झाला होता. वादानंतर गर्दीतील अज्ञातानं शिंदे यांचा हात धरुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या जमावानं शिंदेंना खाली पाडून लाथाबुक्यांनी पोटावर आणि छातीवर बेदम मारहाण केली आहे. जर पोलीस मार खात असतील तेव्हा सामान्य माणसाने कोठे जावे हा प्रश्न उभा राहिला आहे.