बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (07:50 IST)

.महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये

raj thackeray
शनिवारी निवडणूक आयोगाने हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात गोठवले. तसेच शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. या निर्णयानंतर नेतेमंडळींकडून विविध प्रतिक्रिया येत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना वॉर्निंग दिली आहे.
शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही गटांना वापरता येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत नव्या चिन्हासाठी आणि नव्या नावासाठी उद्या दुपारी १ वाजेपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. याचदरम्यान, राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहिली असून त्यात मनसैनिकांना तंबी दिली आहे. "सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन," असे स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी लिहिले आहे.
दरम्यान, उद्या दुपारी १ वाजेपर्यंत शिंदे आणि ठाकरे गटांना आपले नवे चिन्ह आणि नवे नाव निवडणूक आयोगाला द्यायचे आहे. ठाकरे गटाकडून तीन चिन्हे आणि तीन नावे असा पर्याय आयोगाला देण्यात आला आहे.